नंदुरबार l जीवन माळी
नंदूरबार तालुक्यातील चौपाळे गावानजीक आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एसटी बस व दुचाकी अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
नंदूरबार शहरातील देसाईपुरा पेट्रोल पंपासमोरील रहिवासी किसन उर्फ कृष्णा भिमाजी यादबोले (वय 45) हे नंदूरबारहून चौपाळे शिवारात जात असताना समोरून येणाऱ्या एसटी बसचा सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला.
या अपघातानंतर गंभीर दुखापत झालेले किसन यादबोले यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दुपारी अडीचच्या सुमारास त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, सहा भाऊ, भावजई, तीन मुले, असा परिवार आहे.
नंदुरबार येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक भिमाजी गंगाराम यादबोले यांचे सुपुत्र व गवळी समाजाचे पंच व मयूर दूध डेअरीचे संचालक शंकर यादबोले तसेच नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य लक्ष्मण गवळी यांचे ते लहान बंधू होते.
दरम्यान किसन यादबोले यांच्या पार्थिवावर सायंकाळी उशिरा धुळे चौफुली वरील लिंगायत गवळी समाज स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.