नंदुरबार ! प्रतिनिधी
कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक झाली . या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थितीत होते . बैठकीत राज्यातील हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री १० वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे . आता १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल , रेस्तराँ , मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे , अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे .
कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठकीत शाळेचा निर्णयास सर्वांनी विरोध दर्शवला आहे . यामुळे त्यासंदर्भात आता आज रात्री किंवा उद्या मुख्यमंत्री निर्णय जाहीर करणार आहे . बैठकीतील महत्वाचे निर्णय घेण्यात आले यात अनाथांना १ टक्का आरक्षणाचाही निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे . धार्मिकस्थळ तूर्तास बंदच राहणार आहेत . • करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे. कोरोणा प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे . मॉल्स १५ ऑगस्टनंतर सुरु होणार आहे . मॉल्समध्ये जाणाऱ्यांचे लसींचे दोन डोस घेतलेले असले पाहिजे . सरकारी कार्यालय शंभर टक्के उपस्थितीत सुरु राहणार आहे . खाजगी कार्यालयांना २४ तास सुरु राहण्यास परवानगी,जिम , इनडोअर स्टोडियम ५० टक्क्यांच्या उपस्थितीत परवानगी, सिनेमागृह आणि नाट्यगृह पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे .
मंगलकार्यालयांना सूट खुल्या जागेत जे विवाह सोहळा होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉल मधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे . नियमांचे पालन करणार नाही त्यांना दंड आकारण्यात येणार आहे . खाजगी कार्यालयात 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी खाजगी कार्यालयात एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे . त्यामुळे शिफ्टमध्ये काम करता येईल.खाजगी कार्यालयातील कर्मचारी यांचे दोन डोस लस झालेली आहे त्यांना शंभर टक्के क्षमतेने कार्यालय सुरू राहतील .असे ठरले असल्याचे सांगितले.