Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील पाच तालुके झाले तुर्त कोरोनामुक्त, नंदुरबार तालुक्यात फक्त एक कोरोना रूग्ण

team by team
August 10, 2021
in आरोग्य
0

नंदुरबार |  प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हाभरात आज सात जण कोरोनामुक्त झाल्याने पाच तालुके तुर्त कोरोनामुक्त झाले असुन आता नंदुरबार येथे अवघा एक ऍक्टीव्ह रुग्ण आहे.यामुळे आता नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आला आहे.पाच तालुके कोरोनामुक्त झाले असले तरी आता नागरिकांनी बेफिकीरी करायला नको अशा प्रतिक्रीया सुजाण नागरिकांमधून उमटत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात काल दि.११ रोजी सात जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.यामध्ये तळोद्यातील १, अक्कलकुवा येथील ५ तर नवापूर येथील १ अशा सात जणांचा समावेश आहे.यामुळे काल धडगाव व शहाद्यानंतर तळोदा,अक्कलकुवा व नवापूर असे पाच तालुके तूर्तास कोरोनामुक्त झाले आहेत. आता नंदुरबार तालुक्यात अवघा एक ऍक्टीव्ह रुग्ण असल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आला आहे.नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख २८ हजार ८२८ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील ३७ हजार ७०० जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले होते.यातील ३६ हजार ७४९ जण कोरोनामुक्त झाले असून ९५० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नंदुरबार शहरासह तालुक्यात सर्वाधिक ९२ हजार २११ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील १६ हजार २२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यातील १५ हजार ६३३ जण कोरोनामुक्त झाले असून ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे.शहादा तालुक्यात ५८ हजार १८१ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील ११ हजार ६८६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ११ हजार ४५१ जण बरे झाले आहेत तर २३५ जणांचा मृत्यू झाला आहे.तळोदा तालुक्यात २५ हजार २८५ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील तीन हजार ७८० जण पॉझिटिव्ह आढळून आले असून उपचारादरम्यान तीन हजार ६८१ जण बरे झाले आहेत तर ९९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.नवापूर तालुक्यात २७ हजार ६५८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील ४ हजार १४५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यातील ३ हजार ९६७ जण कोरोनामुक्त झाले असून १७८ जणांचा मृत्यू झाला आहे तर अक्कलकुवा तालुक्यात १० हजार २८८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यात एक हजार २०४ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून उपचारादरम्यान एक १७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.तर धडगाव तालुक्यात नऊ हजार ३१३ चाचण्या करण्यात आले असून ८६३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यातील ८४० जण कोरोनामुक्त झाले असून २३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आता अवघा एक ऍक्टीव्ह रुग्ण असल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असला तरी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भारतीय किसान सेना शहादा तालुका अध्यक्षपदी किशोर पाटील यांची नियुक्ती

Next Post

कुपोषित बालकांच्या पोषण आहारात स्थानिक अन्न घटकांचा समावेश करा-ॲड. के.सी.पाडवी

Next Post
कुपोषित बालकांच्या पोषण आहारात स्थानिक अन्न घटकांचा समावेश करा-ॲड. के.सी.पाडवी

कुपोषित बालकांच्या पोषण आहारात स्थानिक अन्न घटकांचा समावेश करा-ॲड. के.सी.पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

June 3, 2026
गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add