म्हसावद l प्रतिनिधी
अखिल भारतीय गुर्जर महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक पाटील यांचे अध्यक्षते खाली इंदोर येथे 114 वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.यावेळी बामखेडा येथील हितेश पटेल यांची अखिल भारतीय युवा एकाई च्या महाराष्ट्र राज्य ‘संयोजक’ पदी निवड होऊन नियुक्ती पत्र देण्यात आले.
या अधिवेशनात मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय महामंत्री, BJP चे वरिष्ठ नेता कैलास विजयवर्गीय , BJP चे राष्ट्रीय महामंत्री अलका गुर्जर, रावेर च्या खासदार रक्षा खडसे, इंदोरचे खासदार शंकर ललवाणी,
मध्यप्रदेश चे कॅबिनेट मंत्री कमल पटेल , राजस्थान चे राज्य मंत्री धीरज गुर्जर, BJP चे हरियाणा महामंत्री सुंदर चौधरी, गुर्जर समाजाचे सर्व मान्यवर नेते तसेच राष्ट्रीय महासचिव (संघटन) बच्चूसिंह बैंसला, गुजरात राज्य अध्यक्ष मोहन पटेल, जगदीश पटेल, सुनील पटेल, सुनील सखाराम पाटील आणि ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.
हितेश पटेल यांच्या निवडी बद्दल अखिल भारतीय गुर्जर महासभेचे युवा ईकाई चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहन काशिनाथ चौधरी, कार्यकारी अध्यक्ष किशोर पटेल यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.








