नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील धान्य गोडावून फोडून चोरट्यांनी ८ हजार रुपये किंमतीच्या एरंडी बियाण्यांच्या गोण्या लंपास केल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा येथील ललीत एकनाथ परदेशी यांचे सोरापाडा येथे धान्य गोडावून आहे. जयसिंग उर्फ कान्ह्या राजू पाडवी व साबीर इसाम शेख (दोघे रा.सोरापाडा ता.अक्कलुकवा) यांनी धान्य गोडावूनचे कुलूप तोडून शटर उचकावून आत प्रवेश केला.
गोडावूनमध्ये असलेले ८ हजार रुपये किंमतीचे एरंडी बियाण्यांचे दोन गोण्या चोरुन नेल्या. याबाबत ललीत परदेशी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३८०, ४५७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकिता बाविस्कर करीत आहेत.