नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पार पडली.दोन पॅनल मध्ये सरळ लढत झालेल्या या निवडणुकीत किसान परिवर्तन पॅनल ला आठ जागा तर प्रतिस्पर्धी पॅनल ला चार जागा मिळाल्या. डॉ.विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली किसान परिवर्तन पॅनलने बारा जागांपैकी आठ जागा मिळवत विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर बहुमत मिळवले.
प्रतिस्पर्धी पॅनल ला चार जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत विजय झालेले सदस्य जंयत शेगजी वळवी, प्रभाकर गणेश वसावे, विश्वास सिंगा वळवी, वसावे मोतूसिंग दिवानजी, वळवी पोलू नाथ्या, चौधरी भिका भाऊ बालसिंग, चौधरी भावना भिका भाऊ, पाडवी सकुबाई सुदाम, संभाजी गोंजी वसावे, रामसिंग धना वळवी, मुन्नीबाई तुंबडू वसावे, गणेश गोरख महाजन यांच्या समावेश आहे.