नंदुरबार | प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासुन जिल्ह्यात तापमान वाढत असुन दि.१० मे रोजी नंदुरबारात ४५.८ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाचे सर्वाधिक तापमानाच्या पार्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी मार्चपासूनच तापमानाचा पारा चाळीशी पार झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला आहे.दरम्यान यंदा मार्चपासूनच तापमानाचा पारा चाळीशी पार झाला आहे. दि. २८ एप्रिल रोजी तब्बल ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.त्यानंतर तापमान घसरत ४० अंश सेल्सिअस पर्यंत घसरले मात्र चार दिवसांपासून तापमानात वाढ झालेली दिसून आली असून दि.१० मे रोजी ४५.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आल्याचे कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी सांगितले.वाढत्या उष्णतेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. दुपारच्या वेळी होणार्या उकडयाने नागरिक हैराण होत आहेत.त्यातच दुपारी अत्यावश्यक कामांसाठी बाहेर निघताना डोक्याला रुमाल, टोपी, डोळ्यांच्या संरक्षणासाठी चष्मे परिधान करूनच बाहेर निघणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाढत्या तापमानात शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी वेळोवेळी पाणी पिण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.