खापर l प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे यासाठी सदस्य नोंदणी कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद वाढवावी असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी खापर व अक्कलकुवा येथे संपन्न झालेल्या शिवसेना व युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
खापर व अक्कलकुवा जि नंदुरबार येथे घेण्यात शिवसेना ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे उटघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेना जिल्हा प्रमुख ललित जाट यांनी केले यावेळी शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविंद्र गुरव,युवासेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, शिवसेना शहर प्रमुख रावेद्रसिंह चंदेल अल्पसंख्यक शहर प्रमुख शाकिफ़ पठान शिवसेना शहर उपप्रमुख जितेंद्र लोहार,संतोष पवार जगदीश चित्रकथी,योगेश सोनार, जसराज पवार,कुलदीप टाक, युवासेना पार्थ लोहार, जमील शेख, जसराज पवार, योगेश तेली,किरण भावसार, रवि पाडवी ,सोनू येशी,केतन वाडीले,मनोज चौधरी,किशोर चौधरी,जोलू वळवी,अनिल परदेशी,सुनील पाडवी आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.