तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील खुर्चीमाळ या दुर्गम ठिकाणी शनिवारी संध्याकाळी बिबट्याने एका दोन वर्षीय बालिकेवर हल्ला केल्याची घटना घडली होता. सुदैवाने बालिका सुरक्षित असली तरी सदर घटना ही अंगावर थरकाप उडवणारी असल्याचे तिचा पालकांच्या प्रत्यक्ष कठणावरून कळते.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील खुर्चीमाळ भागात हे गाव असून या ठिकाणी लांब लांब कुडाचे घरे आहेत . परिसरात दाट जंगल नसले तरी या भागात वन्यजिव अस्तित्व आहे. याच भगात राहत असणाऱ्या सविता सुभाष वसावे या शनिवारी संध्याकाळी सात साडे सातच्या दरम्यान वाळलेले कपडे काढण्यासाठी अंगणात गेल्या असता त्यांची बालिका आराध्या अंगणात दरवाजा जवळ खेळत होती.
या दोन वर्षे बालिकेवर परिसरात आडोसाला घात लावून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत बालिकेचा मानेला पंजात पकडले व फरटत ओढून घेवून जाण्याचा प्रयत्न केला दरम्यान आरध्याचा रडण्याचा आवाज येताच आई सविता व परिसरात बसलेले आजोबा जांत्र्या वसावे यांनी पाहिले. व दोघांनी आरडाओरड केल्याने बिबट्या आवाजाने घाबरला व त्याने आराध्याला त्याच्या पंजातून सोडून धूम ठोकली. दरम्यान बिबट्या सारख्या हिंस्त्र प्राण्याच्या अनुकिचीदार नखांच्या पंजा मुळे बालिकेला मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी प्रसंग सावधान राखत धावपळ करत अक्कलकुवा येथील रुग्णालयात शनिवारी रात्री बालिकास उपचारासाठी दाखल केले. सद्या बालिकेची स्थिती स्थिर असल्याचे बोलले जात आहे.
सदर भाग हा अक्कलकुवा वन क्षेत्र हद्दीत येत असून या ठिकाणी अतीरिक्त भार असलेले तळोदा वनक्षेत्र पाल निलेश रोडे यांचा मार्गदर्शन खाली महाले काम पाहत आहेत. परिसरात वन विभाग कडून फटाके फोडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले असून या वेळी जनजागृती देखील करण्यात येत आहे. रात्री एकट्याने बाहेर निघू नये तसेच वन्य प्राणी बद्दल शंका आल्यास भांड्याचा आवाज काढवा परत असा जीवघेणा हल्ला होवू नये या साठी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभगातर्फे करण्यात आले आहे.