नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील निम्स हॉस्पिटल मध्ये कार्डियाक ऑपरेशन थिएटरचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडवीया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नंदुरबार येथील निम्स मेडिकेअर सर्जिकल आणि डेंटल हॉस्पिटल ने नंदुरबारमध्ये 100 हून अधिक ऍन्जिओग्राफी, एन्जोप्लास्टी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये नवीन कार्डियाक ऑपरेशन थिएटरची सुविधा सुरू केली आहे. ज्याचे उद्घाटन केंद्रीयआरोग्य मंत्री ना.डॉ.मनसुख मांडवीया यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खा डॉ.हिना गावित , माजी मंत्री डॉ. आ.विजयकुमार गावित ,आ. जयकुमार रावल, जिल्हाधिकारी मनीषा खत्री , सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे, डॉ. राजेश वसावे, डॉ शिरीष शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.