धडगाव ! प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेले उमराणी बु येथे ग्रामपंचायत कार्यलयाच्या जनसुविधा हाॅल मध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण शिबिरला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 18 वर्षावरील व 45 वर्षावरील आदिवासी नागरिकांनी लसीकरण करून घेतले.
हे लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी एस.एम.पिगळे आरोग्य सेवक, एस.ए.सुर्यवंशी आरोग्य सेवक, ए.एम.गवळे आरोग्य सेविका, व्हि.आर.शिंदे आरोग्य सेविका, एस.एम.सोलंकी आरोग्य सेविका, तसेच गावातील आशा वर्कर ज्योती पावरा, निर्मला पावरा, सुशिला पावरा, ग्रामपंचायत कर्मचारी प्रभात पावरा, व गावातील युवक चेतन आर. पावरा, दिलीप पावरा, अनिल पावरा, अमर पावरा आदि लसीकरण शिबिर यशस्वीतेसाठी परिश्राम घेतले.