Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुपोषित बालक शोध मोहिमेचा ‘नंदुरबार पॅटर्न’ राज्यात राबविला जाणार

Mahesh Patil by Mahesh Patil
August 3, 2021
in आरोग्य
0
कुपोषित बालक शोध मोहिमेचा ‘नंदुरबार पॅटर्न’ राज्यात राबविला जाणार

नंदुरबार ! प्रतिनिधी

जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कुपोषित बालक शोध मोहिमेच्या ‘नंदुरबार पॅटर्न’चे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले असून येत्या 15 ऑगस्टपासून ही पद्धत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
श्रीमती ठाकूर आणि महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव आय.एस.कुंदन यांच्या उपस्थितीत राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी  नंदुरबार जिल्ह्याने शोध मोहिमेबाबत केलेल्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. शोध मोहिमेसाठी राबविण्यात येणारी पद्धत उत्कृष्ट असून हा ‘पॅटर्न’ राज्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री.गावडे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याचे नमूद करीत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असल्याचेही त्या म्हणाल्या.
श्री.गावडे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेची माहिती दिली. महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग आणि युनिसेफच्या एकत्रित प्रयत्नातून चांगले काम झाले आहे. शासनाच्या निर्देशानुसार वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून शोध मोहिम राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कुपोषित बालकांना पावसाळ्याच्या सुरूवातीस विविध आजारांचा संसर्ग होत असल्याने व त्यामुळे बालमृत्यूदेखील होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी धडक शोध मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत 3 हजार 224 अतितीव्र कुपोषित आणि 17 हजार 519 मध्यम कुपोषित बालके आढळली आहेत. या बालकांना ग्राम बाल विकास केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त आहार देण्यासोबत औषधोपचारही करण्यात येतात. वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्यास अशा बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात किंवा बाल उपचार केंद्रात दाखल  करण्यात येऊन त्यांच्यावर विशेष उपचार करण्यात येतात.

 

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

उमराणी बु येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात 175 लोकांचे झाले लसीकरण

Next Post
उमराणी बु येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात 175 लोकांचे झाले लसीकरण

उमराणी बु येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात 175 लोकांचे झाले लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group