Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुण्यात आढळला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण

team by team
August 1, 2021
in आरोग्य
0
गेल्या दीड वर्षापासून कोरोना साथीने जगभर थैमान घातलं आहे . कोरोनाची लाट जरी ओसरली असली तरी राज्यापुढे नवीन संकट येऊन ठेपलं आहे.झिका व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला आहे , त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे . ANI वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार , पुण्यातील पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे.एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे . या महिलेची प्रकृती स्थिर आहे , अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.झिका व्हायरस सर्वप्रथम कुठे आढळला ? झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला . 1950 पर्यंत तो केवळ आफ्रिका , आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता .2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला ,. 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महामारी घोषित केलं होतं.हेच डास डेंग्यूही पसरवतात.साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं.झिका विषाणूमुळे जन्मजात दोष उद्भवतात.गिलेन बॅरे सिंड्रोमही होऊ शकतो . गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास तिच्या बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं.ताप , सांधेदुखी , शरीरावर चट्टे अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.झिका विषाणूवर अद्याप औषध नाही ; मात्र इनॲक्टिव्हेटेड व्हॅक्सिन विकसित करण्याचे आदेश जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत.मार्च 2016 पासून जगभरातल्या 18 औषध कंपन्या या लसनिर्मितीचं संशोधन करत आहेत.यासाठी 10 वर्षं लागू शकतात , असं त्यांचं म्हणणं आहे.काही लशींच्या चाचण्या झाल्या असल्या , तरी अद्याप कोणत्याच लशीला मंजुरी नाही आणि उत्पादनही सुरू झालेलं नाही . त्यामुळे हा संसर्ग अधिक धोकादायक आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

कोविड कालावधीत रुग्णांना उत्तम सेवा देणाऱ्या तळोदा येथील डॉ.गौरव तांबोळी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

Next Post

म्हसावद येथून साडे पाच लाखाच्या स्पीरीटसह ६ लाखाची कार जप्त,दोघांविरूध्द गुन्हा, एकास अटक

Next Post
म्हसावद येथून साडे पाच लाखाच्या स्पीरीटसह ६ लाखाची कार जप्त,दोघांविरूध्द गुन्हा, एकास अटक

म्हसावद येथून साडे पाच लाखाच्या स्पीरीटसह ६ लाखाची कार जप्त,दोघांविरूध्द गुन्हा, एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add