नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील अंकुर साहित्य संघ , कुबेरग्रुप आणि कुणबी पाटील युवा मंच तर्फे रविवार दि. 10 एप्रिल रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेते व दिग्दर्शक अरुण नलावडे आणि कवी अशोक नायगावकर यांना आमंत्रित करण्यात आले असून कविसंमेलन होणार आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी राहतील . याच कार्यक्रमात विजयकुमार पाटील यांचा आय एम कलेक्टर या पुस्तकाचे प्रकाशन होईल . कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष कुणाल वसावे , नगरसेवक कैलास पाटील , दीपक दिघे , तसेच उद्योजक महेश पवार , सत्यवान सोनार , ज्ञानेश्वर चौधरी शहादा उपस्थित राहतील . कार्यक्रम रविवार दि. 10 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात होईल . रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे .








