Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावळदेत बनावट नोटांची छपाई,दोन लाख 29 हजाराच्याबनावट नोटांसह प्रिंटर मशिन व साहित्य जप्त, दोघांना केली अटक

team by team
April 8, 2022
in क्राईम
0
सावळदेत बनावट नोटांची छपाई,दोन लाख 29 हजाराच्याबनावट नोटांसह प्रिंटर मशिन व साहित्य जप्त, दोघांना केली अटक

शिरपूर l प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत हुबेहुब 500 रुपयांच्या नोटांसारख्या दिसणार्‍या 458 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. दोन लाख 29 हजार रुपयांच्या या बनावट नोटांसह प्रिंटर मशिन व साहित्य जप्त करुन दोघांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर पोलिस ठाण्याचे निरिक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बुधवारी दुपारी सावळदे गावात छापा टाकण्यात आला. धनंजय दिलीप शिरसाठ (कोळी) याच्या घरावर सापळा रचून पोलिसांनी छापा टाकला असता घरच्या वरच्या मजल्यावरील खोलीत शोकेसमध्ये नोटा छापण्याचे मशिन तसेच 500 रुपये दराच्या बनावट नोटा,कागद आढळून आले.
धनंजय कोळी याने काही दिवसांपुर्वीच अशाच नोटांची छपाई करुन गावातीलच मुकेश प्रल्हाद कोळी यास दिल्याचे पोलिसांना समजले. सराईत गुन्हेगार असलेल्या मुकेश कोळीच्या घरीही पोलिसांनी छापा घातला शिवाय त्याच्या अंगझडतीत बनावट 500 रुपयांच्या नोटांचे दोन बंडल आढळून आले. इलेक्ट्रीक फिटींगचे साहित्य, रिकामे खोके, कागद, कागदाचे तुकडे, कटर, मोजमाप पट्टी असे साहित्य पोलिसांनी जप्त करुन दोघांची मिळून दोन लाख 29 हजार रुपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेल्या आहेत. धनंजय व मुकेश या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
निरिक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक किरण बार्हे, उपनिरिक्षक संजय मुरकुटे यांच्यासह पथकातील लादूराम चौधरी, ललित पाटील, विनोद अकडमल, गोविंद कोळी, प्रवीण गोसावी, मनोज दाभाडे, अनिता पावरा, नूतन सोनवणे, रोशणी पाटील, प्रतिभा देशमुख यांनी ही कारवाई केली.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथे चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यास अटक

Next Post

विजयकुमार पाटील यांचे आय एम कलेक्टर या पुस्तकाचे 10 एप्रिल रोजी प्रकाशन

Next Post
विजयकुमार पाटील यांचे आय एम कलेक्टर या पुस्तकाचे 10 एप्रिल रोजी प्रकाशन

विजयकुमार पाटील यांचे आय एम कलेक्टर या पुस्तकाचे 10 एप्रिल रोजी प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add