नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा गावातील शासकीय विश्रामगृहकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा गावातील शिखफळी भागात शासकीय विश्रामगृहकडे जाणाऱ्या रस्त्यावर जावेद उर्फ हाडू जाकीर बलोच रा.संजय नगर, अक्कलकुवा हा रात्रीच्या सुमारास स्वत:चे अस्तित्व लपवून चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेला आढळून आला. याबाबत पोशि.अश्विन अशोक ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात जावेद उर्फ हाडू जाकीर बलोच याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोना.किशोर वळवी करीत आहेत.








