नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यात होणार्या आगामी निवडणुकीसंदर्भात तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निवडणुकीच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपल्या सर्वांना तयारीला लागावे लागेल व नियोजन करावे लागेल असे आवाहन युवा सेनेचे विभागीय सचिव अविष्कार भुसे यांनी केले .
आगामी निवडणुकीच्या संदर्भात युवा सेनेच्या पदाधिकार्यांची बैठक नंदुरबार येथील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आली या बैठकीत उत्तर महाराष्ट्र विभागाचे सचिव अविष्कार भुसे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले . यावेळी धुळे नंदुरबार जिल्हा विस्तारक पंकज गोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, जि.प.चे कृषी सभापती गणेश पराडके, सहसंपर्क प्रमुख दीपक गवते,युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, युवती सेना जिल्हाध्यक्ष मालती वळवी, उपजिल्हाप्रमुख रविंद्र गिरासे, युवासेना जिल्हा सचिव दिनेश भोपे, शहर अधिकारी दादा कोळी ,शिवसेना शाखा प्रमुख दिग्विजय पाटील, लखन माळी, आनंद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी श्री.भुसे बोलत होते.
त्यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे तसेच काम करीत नसलेल्या व्यक्तीचे पद रिक्त करावे्. यासह विविध बाबींचे नियोजन संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पंकज गोरे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र गिरासे यांनी केले सूत्रसंचालन मनोज चव्हाण यांनी केले तर आभार युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अर्जुन मराठे यांनी मानले.