Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोदलपाडा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेण्याचे अँड. पद्माकर वळवी यांचे आवाहन

team by team
April 7, 2022
in आरोग्य
0
मोदलपाडा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेण्याचे अँड. पद्माकर वळवी यांचे आवाहन

तळोदा l प्रतिनिधी
मोदलपाडा ता.तळोदा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण उद्या दि.८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता  आदिवासी विकास मंत्री ना.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे.

मोदलपाडा येथे प्राथमिक आरोग्य कंेंद्राची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा उद्या दि.८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष ऍड.सीमा वळवी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खा.डॉ.हीना गावित, आ.अमरिशभाई पटेल, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.किशोर दराडे, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.शिरीषकुमार नाईक, आ.राजेश पाडवी, माजीमंत्री ऍड.पद्माकर वळवी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, सभापती अजित नाईक, निर्मला राऊत, रतन पाडवी, गणेश पराडके, माजी जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, तळोदा पं.स.सभापती यशवंत ठाकरे, उपसभापती लताबाई वळवी, पं.स.सदस्य सोनी पाडवी, सुमन वळवी, राहूल खाटीक आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी यांनी केले आहे.
दरम्यान, याचवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबीराला नंदुरबार जिल्हा रूग्णालयातील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी व तपासणी नंतर आवश्यक पुढील उपचार तसेच  शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयात नंदुरबार येथे मोफत केली जाणार आहे. सर्व जि.प., पं.स.सदस्य,  सरपंच,  पोलीस पाटील,  कारभारी यांनी आपल्या गाव व परिसरातील जास्तीत जास्त गरजू  रूग्णांना या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन माजी पालकमंत्री ऍड. पद्माकर वळवी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दोन वर्षांच्या खंडानंतर संत दगा महाराजांचे जन्मस्थळ चौपाळे ते आशा पदयात्रेला प्रारंभ

Next Post

राज्यात ‘आदिवासी समाजासाठी’ स्वतंत्र आयोग गठीत करा,ट्रायबल फोरमची मागणी

Next Post
राज्यात ‘आदिवासी समाजासाठी’ स्वतंत्र आयोग गठीत करा,ट्रायबल फोरमची मागणी

राज्यात 'आदिवासी समाजासाठी' स्वतंत्र आयोग गठीत करा,ट्रायबल फोरमची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add