Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नागरिकांची दिशाभूल करुन आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

team by team
March 30, 2022
in राजकीय
0
खोटी पत्रकबाजी करुन नंदुरबार करांची दिशाभुल थांबवावी : मा.आ. चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार | प्रतिनिधी
नगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांना मालमत्ता कर आकारला जात नाही याबाबत यापुर्वीही विरोधकांना सांगण्यात आले आहे. परंतू झालेली विकास कामे विरोधकांना सहन होत नसल्याने ते नको त्या विषयावर नागरिकांची दिशाभूल करुन आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असे प्रत्युत्तर माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिले.
शहरवासियांना अपमानित करून चालवलेली घरपट्टी वसुली पालिकेने थांबवावी तसेच भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशातूनच त्यांनी थकीत घरपट्टीच्या रकमा भरून द्याव्यात आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयचौधरी यांनी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना दिले आहे. तसेच घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांची नावे फलकावर जाहीर करून अपमानित करण्याच्या पद्धतीला भारतीय जनता पार्टीने निदर्शने केले होते. याबाबत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, नगरपालिका ही एकमेव संस्था अशी आहे जी ११ महिने सेवा देत व शेवटच्या महिन्यात कर वसुल करते. तेही काही नागरिक वेळेवर भरत नाहीत. त्यामुळे घरपट्टी वसुलीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. त्यामुळेच थकबाकीदारांच्या नावाचे फलक चौकात लावण्यात आले आहेत. मात्र, दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपा खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. नगरपालिकेच्या एका अधिकार्‍याच्या चुकीमुळे नाटयमंदिराचे कर बाकी असल्याची माहिती समोर आली. मुळात नगरपालिकेच्या मालकीच्या कोणत्याही मालमत्तेला मालमत्ता कर आकारला जात नाही. शेजारच्या शिरपूर नगरपालिकाही कुठलाही कर आकारत नाही, याबाबतचे पत्र शिरपूर पालिकेने दिले आहे. विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जर नाटय मंदिराचे उत्पन्न ४ कोटी असेल तर विरोधकांनी फक्त २ कोटी द्यावे, सीबी गार्डनचे उत्पन्न १० कोटी असेल तर विरोधकांनी ५ कोटी द्यावे, इंदिरा मंगल कार्यालयाचे उत्पन्न एक कोटी असेल तर विरोधकांनी केवळ ५० लाख द्यावे त्यांना या सर्व वास्तू १ एप्रिलपासून हस्तांतरीत करण्यास तयार आहे. मात्र, सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल विरोधकांनी थांबवावी, असेही श्री.रघुवंशी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी येथे विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासाठी ५० लाख तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी २५ लाखाची तरतूद

Next Post

अक्कलकुव्यात २५ लाखाचा अवैध दारूसाठ्यासह ४१ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
अक्कलकुव्यात २५ लाखाचा अवैध दारूसाठ्यासह  ४१ लाखाचा मुद्देमाल जप्त

अक्कलकुव्यात २५ लाखाचा अवैध दारूसाठ्यासह ४१ लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add