म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम ,महासचिव रमेश देसाई, नाशिक जिल्ह्यातील व यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा नंदुरबार जिल्हा दौरा असल्याने शहादा येथे जिल्ह्यातील विश्वगामी पत्रकार संघाची बैठक आयोजित करन्यात आली होता.
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघा मार्फत जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम व महासचिव रमेश देसाई, यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच विविध सामाजिक व वकील संघाचे पदाधिकारी यांनी देखील त्यांचा सत्कार केला. नंदुरबार,नाशिक व यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जिजाबराव पाटील, ॲड. भोजराज शिंदे,कोठवाड़े सर,घनश्याम पाठक यानी आपले मनोगत व्यक्त केले.तर सरचिटणीस देसाई व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यानी यावेळी पत्रकाराना मार्गदर्शन केले.
यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक,पत्रकारिता व विविध सामाजिक उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात अजबसिंग गिरासे(आमोदा),केवलसिंग राजपूत (अंकुशविहीर), एम.सोनार, प्रा. ज्ञानी कुलकर्णी (शहादा), सुधीर वाकलकर(पचरीदेव), मनोज कुमार बाफना (शहादा), कल्पेश राजपूत (मंदाना)यांचा समावेश आहे.या सर्व शिक्षाकांना शाल,श्रीफ़ळ व प्रमाणपत्र देऊंन करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गिरधर मोरे , श्री.गिरासे , यशवंत कलाल यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रस्तविक जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा यांनी केले तर सूत्रसंचालन हदयेश चव्हाण यांनी केले शेवटी आभार अनिल जावरे यांनी मानले.








