म्हसावद l प्रतिनिधि
शहादा तालुक्यातील जाम येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
मंदाणे येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेले जाम हे शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुर्दशा झालेली होती. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या माजी सभापती सौ. जयश्री पाटील व जिल्हा परिषदेच्या सदस्या वंदना पटले यांच्या विशेष प्रयत्नाने दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले होते. या कामाचा शुभारंभ सरपंच ईश्वर वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण पवार , उपाध्यक्ष हिना पाडवी , ग्रामपंचायत सदस्य लखन चव्हाण, पुनम चव्हाण, विमलाबाई चव्हाण, सुभाष वाघ, नवल चव्हाण, ग्रामसेवक नारायण पवार, आखिराज पवार, मच्छिंद्र चव्हाण प्राथमिक शिक्षक तानाजी सुर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.








