नंदूरबार l प्रतिनिधी
दोंडाईचातिल सुप्रसिद्ध धन्वंतरी हृदयरोग तज्ञ चेस्ट फिजिशियन डॉ. निलेशकुमार पवार यांचा 25 मार्च रोजी वाढदिवस होता, त्या निमित्ताने त्यांनी श्री गणेशा क्रिटिकल केअर सेंटरची टीम सह सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले देवमोगरा येथे वैद्यकीय सेवा दिली.यावेळी 120 रुग्णांची तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले.

यावेळी प्रत्येक पेशंटची बी पी व डायबिटीस शुगर तपासणी करून काहींचे हृदय रोग संबंधित पेशंट त्यांचे ईसीजी कार्डिओग्राम करून मोफत औषधोपचार करण्यात आला . त्यात दहा ते पंधरा पेशंटांना डायग्नोसिस करून औषध उपचार करण्यात आले . आठ ते दहा पेशंट यांचे शुगर म्हणजेच डायबिटीस चे निदान करण्यात आले , त्यांना डायबिटीस वरील मोफत औषध उपचार करण्यात आले . वीस ते पंचवीस पेशंटचे अनेमिया म्हणजे शरीरात रक्त कमी असलेले रुग्ण आढळून आले त्यांना पण रक्त वाढीचे मोफत औषध उपचार घेऊन मार्गदर्शन करण्यात आले . तीन ते चार पेशंट सिकल सेल एनीमिया सदृश्य आढळून आले त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन कडून रक्त वाढीचे औषध देण्यात आले व त्यांना पुढील औषधांसाठी जिल्हा रुग्णालयात औषध उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला . तेथील शिबिर यशस्वी होण्यासाठी तेथील जिल्हा परिषद सदस्य किरसिंग पाडवी लाभले त्यांनी दोंडाईचा येथून गेलेल्या सर्व डॉक्टर्स टीम्स सत्कार करून आभार मानले .शिबीर यशस्वी होण्यासाठी डॉ नीलेशकुमार पवार,डॉ भूषण चौधरी , डॉ मनीष गिरासे , डॉ जगदीश चौधरी व रामकृष्ण बोरसे आदींनी परिश्रम घेतले.








