नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे मुस्लिम काकर समाज सेवा समितीतर्फे सामुहिक विवाह सोहळा रज्जाक पार्क , नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला होता . सदर सामुहिक विवाह सोहळ्यात राजस्थान , गुजरात , मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील समाज बांधवांनी तसेच शहरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी हजेरी लावली होती . सदर विवाह सोहळ्यात काकर समाजाच्या ४ जोडप्यांचा विवाह मुस्लिम जातीरिवाजाप्रमाणे लावण्यात आला .
या विवाह सोहळा हा अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला . यावेळी मा. आ . चंद्रकांत रघुवंशी , शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ . विक्रांत मोरे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ . अभिजित मोरे , मा.आ.शिरीष चौधरी , माजी उपनगराध्यक्ष ईश्वर चौधरी , विज माळी, माजी नगराध्यक्ष रविंद्र परदेशी, नगरसेवक परवेज खान , नगरसेवक आनंदा माळी, नगरसेवक फारुक मेमन, लक्ष्मण माळी , मोहन माळी, जगन माळी , माणिक माळी , रिचाज कुरेशी , युनुस खान , आसिफ शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी काकर समाजाचे अध्यक्ष इरफान मोहम्मद काकर , उपाध्यक्ष इमाम काकर , सचिव सुलतान काकर , खजिनदार मुस्तकिम काकर , सहसचिव जफर काकर , संचालक इम्रान काकर,नासिर रज़्ज़ाक काकर,मुश्ताक रशीद काकर,कालीम हसन काकर,मुनिर रहमान काकर, हमिद गनी काकर,भिकन काकर आदीसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले . सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन अजहरुल इस्लाम सैय्यद यांनी केले.








