तळोदा | प्रतिनिधी
तळोदा येथे २९ व ३१ मार्च या दोन दिवसात १२ ते १४ वयोगटातील ५ हजार ८५७ मुला-मुलींना कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२९ व ३१ मार्च २०२२ या दोन दिवशी १२ ते १४ वयोगटातील मुला-मुलींना कोविड-१९ लसीकरण नंदुरबार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या सहनियत्रणांने व गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, तळोदा नगर परिषद मुख्याधिकारी सपना वसावा, तळोदा पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा, गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर यांच्या सहयोगाने लसीकरणांचे दोन दिवशीय मोहिम सुरू करण्यात येत असून यामध्ये शाळेतील व शाळा बाह्या मुला-मुलींना कॉर्बेवॅक्स लस देण्यात येणार आहे. त्यासाठी तळोदा शहरातील न्यू हायस्कुल, शेठ.के.डी.हायस्कूल, कन्या विद्यालय, ऊर्दू हायस्कुल, नेमसुशिल हायस्कुल, विद्यागौरव हायस्कुल, एस.ए.मिशन इंग्लिश हायस्कुल तळोदा या ठिकाणी कोविड-१९ लसीकरण शिबिर सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी कळविले आहे.
यात शहरी भागातील १ हजार ३९९, ग्रामीणभागातील ४ हजार ४५८ असे एकूण ५ हजार ८५७ लाभार्थींना लस देण्यात येणार आहे.








