मुंबई l
केंद्रीय मंत्रीमंडळानं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महिन्यासाठी मुदतवाढ दिली असून, स्पटेंबर२०२२ पर्यंत ती लागू राहील. देशातील ८० कोटीहून अधिक लोक आधीप्रमाणे या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
जगातल्या सर्वात मोठी अन्नसुरक्षा योजना एप्रिल २०२० मधे सुरु झाली.या योजनेचा पाचवा टप्पा या महिन्यात संपत आहे. सरकारनं आतापर्यंतया योजनेवर २.६० लाख कोटींपेक्षा अधिक खर्च केला असून, येत्या सहामहिन्यांसाठी आणखी ८० हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे या योजनेवरचा एकूणखर्च ३.४० लाख कोटी होणार आहे. योजनेअंतर्गत केंद्रसरकार प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा ५ किलो धान्य उपलब्ध करत आहे.केंद्रीय मंत्रीमंडळानं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महिन्यासाठी मुदतवाढ दिली असून, स्पटेंबर२०२२ पर्यंत ती लागू राहील.
भारताची शक्तीदेशातल्या प्रत्येक नागरिकाच्या सक्षमतेमधे सामावली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.या शक्तीला अधिक बळ देण्यासाठी या योजनेला मुदतवाढ दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांनी सांगितले.








