Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार नगरपालिकेचा अजब कारभार, बगलबच्याना सूट तर सामान्य नागरिकांनी लूट : माजी.आमदार शिरीष चौधरी

team by team
March 28, 2022
in राजकीय
0
नंदुरबार नगरपालिकेचा अजब कारभार, बगलबच्याना सूट तर सामान्य नागरिकांनी लूट : माजी.आमदार शिरीष चौधरी

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांची नावे फलकात जाहीर करून आपमानित करण्याच्या पद्धतीला भारतीय जनता पार्टीचा विरोध असून आज शहरातील जुन्या पालिका चौकात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली.

गेल्या दोन वर्षात कोरोना काळात ला‌ॅकडाऊन मुळे व्यावसायिक व सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती पूर्णता खालावल्याने विविध कर व घरपट्टी भरली गेलेली नाही. या आधीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने घरपट्टी माफ करावी अशी मागणी केली होती, परंतु नंदुरबार नगरपालिकेने घरपट्टी थकबाकीदारांची नावे फलकात जाहीर करून वसुलीचा तगादा लावला आहे. कर व घरपट्टी वसुलीसाठी नगरपालिकेच्या वतीने नावे जाहीर करून नागरिकांना अपमानीत करत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जनतेला छळून अपमानित केल्याचे भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणार असून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी त्यांच्या जवळच्या थकबाकीदारांची नावे फलकात जाहीर केलेली नाही. मात्र सामान्य नागरिकांचे नाव फलकात जाहीर केल्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने धिक्कार करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली.
यावेळी माजी आ.शिरिष चौधरी म्हणाले, कोरोना काळात व्यवसाय ठप्प होते.उदरनिर्वाह चालविणे कठीण होते.असे असतांना आता पालिकेने घरपट्टी वसुलीसाठी नगरपालिकेच्यावतीने नावे जाहीर करून नागरिकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केल्याने याचा निषेध करत असल्याचे शिरीष चौधरी यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की.नंदूरबार नगर पालिकेचा अजब कारभार सुरू असून बगलबच्याना सूट तर सामान्य नागरिकांनी लूट करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी.आमदार शिरीष चौधरी, विरोधी पक्षनेता चारुदत्त कळवणकर, नगरसेवक प्रशांत चौधरी, गौरव चौधरी, आनंदा बाबुराव माळी, निलेश माळी, नरेंद्र माळी, माणिक माळी, कुशाल चौधरी राहुल चौधरी यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर : सहा किमीच्या रस्त्याच्या एका टोकाला आमदार तर दुसऱ्या टोकाला खासदारांनी केले भूमिपूजन

Next Post

साकलीउमर ते वेली या रस्त्याचे खडीकरण काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Next Post
साकलीउमर ते वेली या रस्त्याचे खडीकरण काम  निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

साकलीउमर ते वेली या रस्त्याचे खडीकरण काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add