धडगाव l प्रतिनिधी
आदिवासी पावरा मंचची सहविचार सभा सोमवारी (दि. २८ मार्च) धडगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सर्वांच्या सहमतीने विविध ठराव मांडण्यात येऊन ते पारित करण्यात येणार आहेत.
धडगाव येथील स्टेडियममध्ये होणाऱ्या या सहविचार सभेत समाजाने यापूर्वी केलेल्या ठरावात काही बदल करणे, सर्वांच्या सहमतीने काही नवीन ठराव करणे, केलेल्या ठरावांची कडक अंमलबजावणी. होण्यासाठी उपाययोजना करणे यावर चर्चा सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सभेला तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनाही बोलविण्यात आले आहे. सभेला पोलीसपाटील, करवाण्या, डाया, कारभारी, महिला, तरुण, तरुणी, मानसिंग अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आदिवासी पावरा समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी पावरा समाज विचार मंचचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष धनसिंग दादला पावरा, सचिव फेंदा पारशी पावरा व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.








