नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सटीपाणी येथे चारित्र्याच्या संशय घेवून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करून पोलीसांनी चार जणांना अटक केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील सटीपाणी येथील अनिता सुनिल भामरे (२९) या विवाहितेचे लग्न सुनिल भाईदास भामरे यांच्याशी झाले. लग्न झाल्यापासून तर दि.१९ मार्चपर्यंत चारित्र्याच्या संशय घेवून माहेरून शेतीसाठी पैसे आणावेत यासाठी पतीसह सासरच्या मंडळींनी तिला मानसीक त्रास देवून मारहाण केली. त्यांनी दिलेल्या मानसिक शारिरीक त्रासाला कंटाळुन अनिता भामरे झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दारासिंग तेरसिंग जाधव रा.मलगाव (ता.शहादा) यांच्या फिर्यादीवरून सुनिल भाईदास भामरे, भाईदास वन्या भामरे, दुगीबाई भाईदास भामरे, वसंत भाईदास भामरे, राजु भाईदास भामरे सर्व रा.सटीपाणी (ता.शहादा) याच्या विरूध्द शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी दारासिंग तेरसिंग जाधव रा.मलगाव (ता.शहादा) यांच्या फिर्यादीवरून सुनिल भाईदास भामरे, भाईदास वन्या भामरे, वसंत भाईदास भामरे, राजु भाईदास भामरे या चौघांना अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास सपोनि राजन मोरे करीत आहेत.








