म्हसावद l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात एसटीची सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी पुरोगामी संघटनांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
एसटी वाचवा एसटी वाढवा या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी संघटनांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे हित पाहून अवैद्य मार्गाने होणारी सामान्यांची लूट रोखून शासनाने त्वरित एस.टी.पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आणावी.एसटी हे महाराष्ट्रातील समस्त गोरगरीब बहुजनांचे सरकारी वाहन असल्याने एसटीचे खाजगीकरण अजिबात करू नये. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय जाहीर करावा. खेडोपाडी एसटीची सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, व एसटी महामंडळातील भ्रष्टाचाराला आळा घालावा, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटी वाचवणे संदर्भात नंदुरबार जिल्ह्यातील पुरोगामी संघटना नर्मदा बचाव आंदोलन,सत्यशोधक शेतकरी कष्टकरी सभा, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, फुले-आंबेडकर स्टडी सर्कल, विचारधारा फाउंडेशन,इब्ता शिक्षक संघटना,महाराष्ट्र हमाल मापाडी महामंडळ, आदिवासी एकता परिषद ई. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.या निवेदनावर तारा मराठे, ॲड. योगिनी खानविलकर, चेतन साळवे, किशोर ढमाले, लतिका राजपूत, डॉ. किशोर सामुद्रे, शिवाजीराव मोरे, तात्याजी पवार, दादाभाई पिंपळे, अनिल कुवर, प्रा.जयपाल शिंदे, वाहरू भाऊ सोनवणे, संतोष पावरा, रघुनाथ बळसाने, करमसिंग कोकणी,विक्रम गावित, बाबुराव पाटील, संतोष पाटील, कृष्णा वसावे, कैलास पाटील, गणेश पाडवी. आदींच्या सह्या आहेत.