नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूने जमिअत उलमा नंदुरबार येथील मौलाना अरशद मदनी यांच्यातर्फे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले या टाकीचे उद्घाटन नाजिमे तालीमात जामिया अक्कलकुवा चे मोलाना वस्तानवी यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजेश वसावे होते.यावेळी डॉ.अनिल गावित ,डॉ. प्रकाश गावित, डॉ.रोहन थोरात, हाफिज अब्दुल्ला, जिल्हा सचिव राजू इनामदार, डॉ. जमील मंसूरी, जुल्फेकार सौदागर, नाझीम काझी ऑफिज शहेर, हाफिज अकलाक, मुक्ती शाहरुख ,मौलाना जकरिया, मौलाना वसीम बागवान, हाफिज गुलाब भगवान, यांच्यासह नंदुरबार, अक्कलकुवा ,शहादा, विसरवाडी, चिचपाडा ,तळोदा ,धडगाव ,खांडबारा येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ रजी यांनी केले तर आभार राजू इमानदार यांनी मानले.