नवी दिल्ली
दोन वर्षांपूर्वीच कालच्या दिवशी देशभरात लॉकडाऊन सुरू झाला होता अनेक निर्बंध लावण्यात आले होते . पण , आता कोरोनाची लाट ओसर ल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाची सर्व निर्बंध हटवले जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे . मात्र मास्क आणि सहा फूट अंतर राखण्याची नियम लागू राहणार आहे .
केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे . देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने महामारी रोखण्यासाठी लादलेले सर्व निर्बंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे .गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १ हजार ७७८ नवीन रुग्ण आढळले असन ६२ जणांचा मृत्य झाला आहे .
तर काल १ हजार ५८१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि ३३ जणांचा मृत्यू झाला होता . देशात आतापर्यंत ४ कोटी ३० लाख १२ हजार ७४ ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार , मंगळवारी दिवसभरात देशात २ हजार ५४२ लोक कोरोनामुक्त झाले आहेत . त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार ८७ वर आली आहे . कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख १६ हजार ६०५ झाली आहे . आकडेवारीनुसार , आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ७३ हजार ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत . या पार्श्वभूमिवर , आरोग्य मंत्रालयाने मास्क आणि फिजीकल डिस्टन्सींग वगळता अन्य नियम शिथील करण्याची घोषणा केली आहे . या निर्देशानुसार आता राज्य सरकारे नियम जाहीर करण्याची शक्यता आहे .३१ मार्चपासून कोरोना निर्बंध संपणार आहेत . दोन वर्षांनंतर देशातील जनतेची या निर्बंधातून सुटका झाली .