नंदुरबार l प्रतिनिधी
येथील जय खंडेराव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खंडेराव बॉईल तसेच जय हनुमान व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास माल्यार्पण करुन ताक वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, माजी प्र.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रविंद्र पवार, ऑल इंडीया न्युज पेपर असोसिएशनचे अध्यक्ष सुर्यभान राजपूत, न.पा.चे प्रतोद चारुदत्त कळवणकर, नगरसेवक गजेंद्र शिंपी, राष्ट्रवादीचे युवानेते ऍड.राऊ मोरे, युवासेनेचे जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, ड्रीम कन्स्ट्रक्शनचे संचालक इंजि.किरण तडवी, माजी शिक्षण मंडळ सभापती विलास रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष शामबापू मराठे, राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, माजी नगरसेवक रोहिदास पवार, पत्रकार बाबासाहेब राजपूत, गुरव समाज अध्यक्ष प्रविण गुरव, माजी नगरसेवक अर्जुन रामदास मराठे, जितेंद्र मराठे, मोहितसिंग राजपूत, पंकज राजपूत, विकास पवार, चेतन राजपूत, सागर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना गजेंद्र शिंपी म्हणाले की, आजच्या युवकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. आजच्या युवकांनी एकत्रित येवून आपली युवाशक्ती देशासाठी व आपल्या समाजासाठी वापरली पाहीजे. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते ताक वाटपाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन संस्थेचे सचिव कृष्णा मराठे यांनी केले. तर आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादू मराठे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय हनुमान व्यायाम शाळेचे लल्ला मराठे, राहुल मराठे, गुल्लू मराठे, सचिन मराठे, राजा मराठे, प्रकाश मराठे, योगेश मराठे, रोहित दाणेज, बिट्टू मराठे, दर्शन मराठे, मिलिंद मोहिते तसेच खंडेराव बॉईजचे बंटी मराठे, सारंग शिंपी, देवांशू राजपूत, भावेश मराठे, जयेश मराठे, शांतू मराठे, भैय्या कानोसे, दादा जळोदकर आदींनी परिश्रम घेतले.








