नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील घाटली येथे होळीच्या दांडयाचा शेंडा कापल्याप्रकरणी पती पत्नीस मारहाण करणार्या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यातील घाटली येथे फिर्यादी अनिता भरत वळवी यांच्या अंगणात होळी पेटते त्याठिकाणी त्यांचा पती भरत वळवी याने होळीचा बांबूचा शेंडा कापल्या राग आल्याने भाद्या वळवी व इतर दोघांनी त्यांना मारहाण केली. या दरम्यान अनिता वळवी समजविण्यास गेल्या असता भाद्या वळवी याने त्यांच्या डोक्यात दगड टाकून दुखापत केली. याप्रकरणी अनिता भरत वळवी रा.घाटली ता.धडगांव यांच्या फिर्यादीवरून भाद्या रमेश वळवी, देविदास कालसा वळवी, गणेश कालशा वळवी तिन्ही रा.घाटली आंबापाडा ता.धडगांव यांच्या विरूध्द भादंवि कलम ३२६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास योगेश निकम करीत आहेत.








