नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील राजबर्डी बारीपाडा येथील शेतात पोलीसांनी छापा टाकत ३ लाख ६० हजार रूपये किंमतीचे बनावट दारू बनविण्यासाठी असलेले स्पिरीट जप्त केले. याप्रकरणी एकाविरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यातील राजबर्डी बारीपाडा येथे माकत्या पावरा यांच्या शेतात बनावट दारू बनवित असल्याची पोलीसांनी माहिती मिळाली. पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकत ३ लाख ६० हजार रूपये किंमतीचा १२०० लिटर स्पिरीट जप्त केले. सदर स्पिरीट हे मानवी शरीरास अपायकारक असून बनावट दारू बनविण्यासाठी त्याचा उपयोग केला जाता होता. याप्रकरणी पोलीसांनी छापा टाकताच एकाने डोंगर उताराचा व झुडपांचा फायदा घेत पळून जाण्यास यशस्वी झाला. याप्रकरणी पोलीस शिपाई दिपक न्हावी यांच्या फिर्यादीवरून दिलीप उर्फ दिला जहागीर पावरा रा.राजबर्डी ता.धडगांव याच्याविरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२८ सह महाराष्ट्र दारू का.क.६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोसई आर.एस.भदाणे करीत आहेत.








