नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदु सेवा सहाय्य समितीने गेल्या दीड वर्षापासून जुनी नगरपालिका स्थित शिवछत्रपतींचा स्मारकावर दररोज सकाळी ७ वाजता नित्य अभिषेक पूजन सुरू केले आहे. शिवछत्रपती जयंतीनिमित्ताने शिवछत्रपती पुतळ्याचे पद्याचा घोषात सामूहिक अभिषेक-पूजन कार्यक्रम तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया सोमवार दि.२१ मार्च २०२१ करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपतींचा पूर्ण घोषणाने बालधारकरी विनायक राजपूत याने करून आकाश गावित यांनी प्रेरणामंत्राने सुरुवात केली. हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक डॉ नरेंद्र पाटील यांनी शिवजयंतीचे महत्व विशद करतांना सांगितले की, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अश्या महान शिवछत्रपतींचे स्मरण ३६५ दिवस २४ तास हिंदूंनी केल्यास हिंदुराष्ट्र स्थापन करणे शक्य होणार आहे. महाराजांचा पुतळ्याची नित्य सेवा व्हावी याउद्देशाने हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक दररोज सकाळी ७ वाजता शिवछत्रपती नित्य अभिषेक पूजन हा उपक्रम गेल्या दीड वर्षापासून सुरू केला आहे तरी सर्वांनी अभिषेक पूजनासाठी दररोज उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे पद्यचा जयघोषात दूधाभिषेक, सुगंधी द्रव्यांनी जलाभिषेक उपस्थित जेष्ठ हिंदुत्ववादी शंकरलाल अग्रवाल यांच्यासह शिवभक्तांनी केला. पूजन भवरलाल जैन यांनी तर माल्यार्पण आनंदा माळी केले. ध्येय मंत्र, घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी राजपूत समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक अशोक राजपूत, मोहन खानवानी, सुरेश अग्रवाल, ऍड अविनाश पाटील, डॉ चेतन चौधरी, विहिंप दादा शिनगर, भिमसिंग राजपूत, नरेंद्र माळी, मोहिनीराज राजपूत, अजय कासार, चेतन राजपूत सह शिवभक्त, हिंदुत्ववादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजू चौधरी यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचा धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.








