नंदुरबार l प्रतिनिधी
येथील जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
नंदुरबार शहरातील जुनी नगरपालिका चौकात सुशोभित चबुतऱ्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवछत्रपती यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, उपशहराध्यक्ष राम ठक्कर, प्रसिद्धीप्रमुख कल्पेश माळी, अनिल नेतले, पंकज मराठे आदी उपस्थित होते.








