नंदूरबार l प्रतिनिधी
इंडोनेशिया संसदेच्या आमंत्रणावरून इंटर पार्लियामेंटरी युनियनची ( आयपीयू ) १४४ वी असेम्ब्ली नुसा दुआ बाली इंडोनेशिया येथे २० ते २४ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली असून नुसा दुआ इंडोनेशिया येथे आज बाल अर्थसंकल्प या विषयावर खा.डॉ. हीना विजयकुमार गावित यांनी मार्गदर्शन केले.

इंडोनेशिया संसदेच्या आमंत्रणावरून इंटर पार्लियामेंटरी युनियनची ( आयपीयू ) १४४ वी असेम्ब्ली नुसा दुआ बाली इंडोनेशिया येथे २० ते २४ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली असून , या असेम्ब्लीसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारतातून जाणाऱ्या सहा खासदारांच्या शिष्टमंडळात खा.डॉ. हीना गावित यांची निवड केली आहे . भारतीय शिष्टमंडळासह १८ मार्चला खासदार डॉ.गावीत या दिल्ली येथून देनपसार बाली इंडोनेशिया येथे रवाना झाल्या . आज २१ मार्च २०२२ ला खासदारांच्या या आयपीयू गव्हर्निंग कौन्सिलला नुसा दुआ इंडोनेशिया येथे आज बाल अर्थसंकल्प या विषयावर खा.डॉ. हीना विजयकुमार गावित यांनी मार्गदर्शन केले.








