नंदूरबार l प्रतिनिधी
शिवजयंती निमित्त एकता युवक व्यायामशाळा श्रीराम सेना एकता नगर, नंदुरबार यांच्यातर्फे शिवप्रतिमा पूजन व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिवाजी येडगे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी सचिव युवारंग फाउंडेशन राहुल शिंदे, नगरसेवक प्रतिनिधी अमर वळवी उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबीरात एकुण 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले यांत विजय तेलंग,अमर वळवी, किरण आल्हाट, विजय कोळी, पप्पू मराठे, दीपक ठाकरे, देवेंद्र तंबोळी, विक्की पवार, अमोल शिंदे, हर्षद भोसले, गणेश पाटिल, नरेश बोरसे, राहुल शिंदे, मुकेश सोनवने, पंकज मराठे, अनिल वाकडे, सोमनाथ वाकडे, अर्जुन जाधव, सागर गोसावी, गोरख बाशिंगे, सागर पगारे, विनोद कोळी, सागर मोरे, हेमंत खैरनार, पंकज भोई, धीरज घरटे, किसन भोई, विशाल बोरसे,अभिषेक मिस्त्री, दिलीप आल्हाट, आदेश मिश्रा यांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. रमा वाडेकर, महेंद्र चव्हाण, जयेश सोनवणे, आकाश मावची, ईश्वर वसावे, निलेश वळवी शरद पाडवी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी पप्पू मराठे, देवेंद्र सौपुरे, दिपक ठाकरे व संपूर्ण एकता ग्रुपने परिश्रम घेतले.








