नंदुरबार | प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे दि.२३ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ५६ गटात राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रा आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुढे बोलतांना जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे म्हणाले की, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ५६ गटात दि.२३ मार्च ते २५ मार्च राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रत्येक गटातील राष्ट्रवादीचे जुने तसेच नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. या परिसरातील समस्या असो अथवा विविध विकास कामे असू किंवा नियोजीत विकास कामे असो या संदर्भात परिसरातील कार्यकर्ते नागरीक यांच्या समस्या या यात्रेच्या माध्यमातून सोडविण्यात प्रयत्न केला जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून नविन कार्यकर्त्यांची गाठ जुळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. असे डॉ.मोरे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी पार्टीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ५६ गटात फिरून सक्रीय सहभाग करण्याचा काम यावेळी करण्यात येणार आहे. परंतु हे काम करीत असतांना राष्ट्रवादीच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सुत्रानुसार प्रत्येक गटात पक्षविरहीत बैठकांचेही आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता सदस्य अथवा पदाधिकारी असो, त्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सध्याच्या काळात तरूणांचा मनात काही पक्ष जातीवात पंथवाद भिनवत आहेत. त्या तरूणांचेही या यात्रेनिमित्त उद्बोधन करून तरूणांना राष्ट्रवादाकडे वळविण्यासाठी या यात्रेतून प्रयत्न करणार आहोत. दि.२३ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रेत नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी दिली.
असा असेल कार्यक्रम
नंदुरबार तालुका- खोंडामळी गट, कोपर्ली गट दि.२३ मार्च, रनाळा,मांडळ गट दि.२४ मार्च, आष्टे, नांदर्खे गट दि.२५ मार्च, पातोंडा, कोळदा गट दि.२६ मार्च, धानोरा, कोठली गट दि.२९ मार्च. शहादा तालुका- कुढावद, पाडळदा गट दि. ३० मार्च, प्रकाशा, सारंगखेडा गट दि.३१ मार्च, लोणखेडा, मोहिदे गट दि.१ एप्रिल, कहाटुळ, वडाळी गट दि.२ एप्रिल, कन्साई, म्हसावद गट दि.३ एप्रिल, सुलतानपूर खेडदिगर गट दि.४ एप्रिल, चांदसैली, मंदाणा गट दि.५ एप्रिल. अक्कलकुवा तालुका- अक्कलकुवा, गंगापूर गट दि.७ एप्रिल, रायसिंगपुर, खापर गट दि.८ एप्रिल, होराफळी, मोरंबा गट दि.९ एप्रिल, भांग्रापाणी, वेली गट दि.१० एप्रिल, भगदरी, पिंपळखुटा दि.११ एप्रिल. या पध्दतीने राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रा आयोजित करण्यात आली आहे.








