Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ड्रॅगनफ्रुट’ लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावे

Mahesh Patil by Mahesh Patil
July 28, 2021
in कृषी
0

नंदुरबार ! प्रतिनिधी

कृषि विभागाने सन 2021-2022 वर्षांपासून एकात्मिक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत ड्रॅगनफ्रुट (कमलम)  लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केले असून या फळपिकाची लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
ड्रॅगनफ्रुट हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्वपुर्ण फळ असून भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मूल्य इत्यादी बाबी लक्षात घेवून फलोत्पादन विकास अभियानातुन ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने निश्चीत केले आहे.
ड्रॅगनफ्रुट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषकतत्व आणि ॲन्टीऑक्सीडंन्टमुळे या फळास सुपर फ्रुट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. या व्यतिरिक्त या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शीयम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकुन राहतात. तसेच या पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.
 ड्रॅगनफ्रुट फळपिकांची लागवड करण्यासाठी जमीनीची पुर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मीटर x 3 मीटर ,3 मीटर x 2.5 मीटर या अंतरावर खड्डे खोदुन खड्याच्या मधोमध सिमेंट कॉक्रीटचा किमान 6 फुट उंचीचा खांब व त्यावर काँक्रीटची फ्रेम बसविण्यात यावी. सदर सिमेंट कॉक्रीट खांबाच्या एक बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.
ड्रॅगनफ्रुट फळपिकांची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, संरक्षण याबाबीकरीता अनुदान देय असून याकरीता 4 लाख प्रति हेक्टर प्रकल्पमुल्य ग्राह्य धरुन 40 टक्के रक्कम  1 लाख 60 हजार अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तीसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य आहे.
अधिकाधिक शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रीयेचा मार्ग मोकळा: शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांचे निर्देश

Next Post

एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रीयेचा मार्ग मोकळा: शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदूरबार येथे झाड तोडताना मोठे खोड घरावर पडल्याने सात जण जखमी

नंदूरबार येथे झाड तोडताना मोठे खोड घरावर पडल्याने सात जण जखमी

May 28, 2023
खा.शरद पवार यांनी जाणून घेतला नंदुरबार जिल्ह्यातील आगामी निवडणुकींचा आढावा

खा.शरद पवार यांनी जाणून घेतला नंदुरबार जिल्ह्यातील आगामी निवडणुकींचा आढावा

May 28, 2023
ब्रेकिंग न्यूज: अविनाश माळी यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

ब्रेकिंग न्यूज: अविनाश माळी यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

May 28, 2023
विविध उपक्रमांनी संत भिमा भोई जन्मोत्सव उत्साहात साजरा

विविध उपक्रमांनी संत भिमा भोई जन्मोत्सव उत्साहात साजरा

May 28, 2023
नवापूर संजय गांधी निराधार समितीच्या तालुकाध्यक्ष पदी अमृत गावित, भरत गावित यांनी केला सत्कार

नवापूर संजय गांधी निराधार समितीच्या तालुकाध्यक्ष पदी अमृत गावित, भरत गावित यांनी केला सत्कार

May 28, 2023
नंदुरबार शहरात सीटी बस सुरु करण्याची संकल्प निर्माण फाउंडेशनची मागणी

नंदुरबार शहरात सीटी बस सुरु करण्याची संकल्प निर्माण फाउंडेशनची मागणी

May 28, 2023

एकूण वाचक

  • 2,966,020 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group