नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील 59 लाभार्थ्यांना सिंचन विहीर व गोठयांच्या मंजुरीचे आदेश सोमवारी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं.स आवारातील शिवरायांच्या अर्धकृती पुतळ्यास माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी,पं.स उपसभापती कमलेश महाले,जि.प सदस्य देवमन पवार, जि.प माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के. पाटील,माजी जि.प.सदस्य डॉ. सयाजीराव मोरे,जि.प सदस्य प्रतिनिधी सुरेश शिंत्रे, नगरसेवक दीपक दिघे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे,पं.स तेजस पवार,धर्मेंद्र परदेशी, संतोष साबळे,प्रल्हाद राठोड, सुनील वसावे,अंबु पाडवी,श्रीमती बायजाबाई भिल,कलाबाई भिल,अंजना वसावे आदी उपस्थित होते.यावेळी नंदूरबार तालुक्यातील घोटाणे,दुधाळे, खोक्राळे,भोणे,सुंदरदे,वेलवड,भालेर,ठाणेपाडा,वासदरे या गावातील 59 पात्र लाभार्थ्यांना सिंचन विहीर व गोठयांच्या मंजुरीचे आदेश देण्यात आले. 59 लाभार्थ्यांना 1 कोटी 82 लाख 17 हजार 500 रूपयांच्या योजनेच्या लाभ झाला.