नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार पंचायत समितीतर्फे नंदुरबार तालुक्यातील लाभार्थ्यांना वैयक्तिक सिंचन विहीर,शबरी घरकुल,रमाई घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थीना मंजुरी व आदेश वाटप खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमास पं. स. सभापती प्रकाश गावित, जि. प. सदस्या डॉ.सुप्रिया गावित, जि. प. सदस्या अर्चना गावित, राजश्री गावित तसेच पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहीर मंजुरीचे आदेश वाटप
पंचायत समिती नंदुरबार येथे खा.हिना गावित यांच्या हस्ते तालुक्यातील मंजूर सिंचन विहिरींचे आदेश प्रतिनिधी स्वरूपात वाटप करण्यात आले होते. दरम्यान भालेर ता.नंदुरबार येथील मंजूर सात विहिरींचे आदेश आज रोजी भालेर येथे काकेश्वर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आले याप्रसंगी संस्थेचे सचिव भिका भाना पाटील, गजानन संतोष पाटील , रमेश पाटील , चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.सदर योजना वैयक्तिक लाभाची योजना असून त्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पुढील वर्षासाठी ग्रामपंचायत भालेर मार्फत अर्ज सादर करून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.