नंदुरबार l प्रतिनिधी
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी ) प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. हे विशेष शिबिर जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे दर बुधवार व शुक्रवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान होईल. जिल्ह्यातील ज्या दिव्यांग व्यक्तींनी अद्याप वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी ) काढलेले नाही, अशा सर्व दिव्यांग व्यक्तींनी वरील दिवशी जिल्हा रुग्णालयात उपस्थित राहून या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. जी. नांदगावकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.