नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील खडक्या येथे उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील खडक्या येथील नरपत वण्या वसावे यांनी सागर बोडा वळवी यांना उसनवार दिलेले पैसे परत मागितले. याचा राग आल्याने नरपत वसावे यांना सागर बोडा वळवी व रवि बोडा वळवी दोघे रा.खडक्या ता.धडगाव यांनी दगडाने पाठीवर, तोंडावर, मानेवर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत नरपत वसावे यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात सागर वळवी व रवि वळवी यांच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.योगेश निकम करीत आहेत.