नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील बिलगाव येथे सुनेला अंगणवाडीत नोकरीला लावले नाही या कारणावरुन महिलेस डोक्यावर लाकडाने मारुन दुखापत केल्याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, बिलगाव ता.धडगाव येथील सिपायडीबाई जामसिंग पावरा यांचे पती जामसिंग पावरा सरपंच असतांना रमेश गुलाबसिंग पावरा यांच्या सुनेला अंगणवाडीत नोकरीला लावले नाही. याचे वाईट वाटून जामसिंग पावरा यांना रमेश पावरा यांनी शिवीगाळ केली. यावेळी सिपायडीबाई पावरा या समजविण्यासाठी गेल्या असता रमेश पावरा याने लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत केली. याबाबत सिपायडीबाई पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात रमेश पावरा याच्याविरोधात भादंवि कलम ३२६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.कालूसिंग पाडवी करीत आहेत.