नंदुरबार ! प्रतिनिधी
शासनाने दि.५ जून २०२१ चा परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील शाळा इ.८ ते १२ पर्यत वर्ग १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.परंतु, अद्यापही बऱ्याच कोविड मुक्त भागात शाळा सुरू झालेल्या नाहीत या मुळे बंद असलेल्या शाळा त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी जितेंद्र पावरा धुळे युवा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केली आहे .
निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे न भरून येण्यासारखे शैक्षणिक नुकसान झाले आहे.आर्थिक परिस्थिती, हॅन्डराईड मोबाईल,मोबाईल आहे तर नेटवर्क नाही याकारणाने ऑनलाईन शिक्षणही झाले नाही.तरी इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन वर्ग शाळा व्यवस्थापन समिती ठराव, ग्रामपंचायत ठराव,पालकांचे संमती पत्र घेऊन त्वरित शाळा,महाविद्यालये सुरू करण्याचा सूचना मुख्याध्यापक यांना देण्यात यावे अशी मागणी जितेंद्र पावरा धुळे युवा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी पालकमंत्री, प्रकल्पधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक धुळे यांना निवेदन देण्यात आले.