नंदुरबार ! प्रतिनिधी
मानधनाचे बिल मंजुर करण्यासाठी प्रत्येकी हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोघां डॉक्टरांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. आज दि.२३ जुलै रोजी दुपारी धुळे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
शिंदखेडा तालुक्याच्या नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराने त्याने केलेल्या एनआरएचएम अंतर्गतच्या कामाच्या मानधनाचे १७ हजार रुपयांचे बिल मंजुर करण्यासाठी आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भुषण पंडीत मोरे (वय ३४ रा.वर्षी ता.शिंदखेडा) आणि डॉ.पंकज बारकु वाडेकर (रा.दत्त कॉलनी,साईमंदिराजवळ देवपुर,धुळे) यांनी प्रत्येकी हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून आज दुपारी सापळा रचला. डॉ.मोेरे आणि डॉ.वाडेकर हे या दोघांनी प्रत्येकी १ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची काम सुरु आहे. ही कारवाई एसीबीचे नाशिक विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोलिस उपअधिक्षक सुनिल कुराडे, निरीक्षक झोडगे, राजन कदम, शरद काटके, जयंत साळवे, संतोष पावरा, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, महेश मोरे, कैलास जोहरे, पुरुषोत्तम सोनवणे,गायत्री पाटील, संदीप कदम,सुधिर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.