म्हसावद l प्रतिनिधी
अनिस मार्फत मोलगी परिसरातील सर्व पक्षीय राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थित कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले होते.
मोलगी परिसरातील सर्व पक्षीय राजकीय,व सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांचा डाकीण, भूत या अंधश्रद्धेवर असलेला विश्वास अजुनही कायम आहे.तसेच रुढी परंपरा चालीरिती अशि विविध विषयावर चर्चा करुन आपल्या जीवनातील बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा विचार करावा असे विनायक साळवे, सी के पाडवी, अशोक राऊत, आपसिंग वसावे,धनसिंग वसावे, रायसिंग पाडवी,फुलसिंग वळवी, सुमित्रा वसावे आदींनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला मोलगी परिसर सेवा समितीचे कार्यकर्ते,आपसिंग वसावे, विनायक साळवे महाराष्ट्र राज्य अनिसचे सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष अशोक राऊत,जि.प.सदस्य सी.के पाडवी,ब्रिजलाल पाडवी (बार्टी पुणे) समतादूत तथा सामाजिक कार्यकर्ता धनसिंग वसावे,दिलीप वसावे, रायसिंग वसावे,रामसिंग राऊत,सुरुपसिंग वसावे, ॲड. फुलसिंग वळवी,पांडुरंग वळवी,अमृत वसावे,बहादूरसिंग पाडवी, देवजी वसावे, ॲड. राज्या पाडवी,सुमित्रा वसावे,शीतल वसावे,आदी उपस्थित होते.








