नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा ते नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे पायी लाँगमोर्चा विविध मागण्यांसाठी आज सकाळी 11 वाजता पी.आर.पी.चे महाराष्ट्रप्रदेश उपाअध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.
शहादा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन लॉंगमोर्चा सकाळी 11 वाजता दोंडाईचा रोड, सप्तश्रृंगीमाता मंदिरमार्गे प्रकाशारोड हायवे प्रकाशामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे धडकणार आहे सदर मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या ह्या कोरोना काळात वारंवार होणारे लॉकडाऊन बंद करणे, एस.टी.महामंडळाचे विलीनीकरण झाले पाहिजे, महागाईत डिझेल पेट्रोलचे दर केंद्रसरकारने कमी करावे, शेतकरी बेरोजगार यांना कर्ज पुरवठा न करणाऱ्या बँकांची चौकशी करून तात्काळ कर्ज पुरवठा झाला पाहिजे, शहादा येथील पोलिसस्टेशनचे ग्रामीण तालुका व शहरीपोलिस स्टेशन अशी दोन स्वतंत्र पोलिसस्टेशनची निर्मिती झाली पाहीजे, बजाज फायनान्स कंपनी यांचे लायसन्स रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, दादर रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामांतर करावे, बहुजनवादी व संविधानवादी नेत्यांना ईडीच्या नावाखाली टारगेट करणे बंद करावे, स्व.दादासाहेब गायकवाड यांचे नाव नाशिक येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास देण्यात यावे, जिवघेणी गॅस दरवाढ रद्द करा, आदिवासीच्या जल जंगलजमिनीचे संरक्षण झाले पाहीजे, खाजगीकरण नही चलेगा अश्या विविध मागण्यांसाठी ऐतिहासिक पायी लॉगमोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व जगन सोनवणे महाराष्ट्र प्रदेश पी.आर.पी. उपअध्यक्ष जगन सोनवणे, नगरसेवक जयदिप मोरे यांच्यासह पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते