म्हसावद l प्रतिनिधी
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्यावतीने तळोदा प्रकल्प कार्यालयातील माकत्या वसावेला पुन्हा कामावर घ्यावे तसेच खोटा गुन्हा दाखल केला आहे तो घेण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व निवेदनात म्हटले आहे की, दि.31 डिसेंबर 2021रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्यावतीने प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा यांना निवेदन सादर करण्यात आले होते.सदर निवेदन देऊन 1महिनाचा कालावधी उलटल्यानंतर देखील त्यांना सेवेत घेण्यात आले नाही.सदर निवेदनातून सदर घटनेचा घटनाक्रम नमूद करून त्यांच्याविरूध्द खोटया स्वरूपाची तक्रारी अर्ज करून त्या कारणावरुन त्यांना सदरच्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.त्यामुळे आदिवासी संघटनांनी तीव्र शब्दात आक्षेप नोंदविला असून ज्या लोकानी तालुका व्यवस्थापक माकत्या वसावे यांच्या विरुध्द तक्राऱ्या केल्या होत्या त्यास बनावट स्वरूपाचा असल्याचा खळबळजनक खुलासा दि.03 जानेवारी 2022 रोजी तक्रारदारांपैकी अनेक लोकांनी आरोपी यादीतून नांव कमी करून उलट सदरच्या नावाचा गैरवापर झालेला दिसुन आला आहे.अशी गंभीर स्वरूपाची मागणी आरोपी यादीतील काही लोकांनी केली आहे
अशा सर्व परिस्थितीवरून स्पष्ट होते की माकत्या वसावे यांचेवर कोणत्या कारणाच्या आधारे कार्यवाही करण्यात आली हा एक संशोधनाचा विषय उपस्थित झाला असून. एकिकडे तक्रारदाराच्या म्हणन्यानुसार आम्ही कोठेही तक्रार केली नाही यावरून असे दिसून येत आहे की, फक्त राजकीय स्वार्थापोटी त्यांचेवर हि कार्यवाही झालेली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.दि 31 डिसेंबर 2021 रोजी संघटनेने कायदेशीर कार्यवाही होण्याची मागणी करून देखील प्रशासकीय स्तरावरून कोणतीही कार्यवाही झालेली नाही व त्यांना जाणीवपूर्वक व हेतूपुरस्कर त्यांना दुर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रादारांच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर जिल्हधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले होते.असे असतांना देखील तक्रादारांच्या मागण्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करून तक्रारदार मागणी मान्य करण्यात आली नाही.म्हणुन दि.10 जानेवारी 2022 रोजी जिल्हधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असून यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पुर्णत: प्रशासन जबाबदार असणार सदर तक्रारीची नोंद घेण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे प्रवक्ता अँड.गणपत पाडवी.नंदुरबार जिल्हाअध्यक्ष रवी सोनवणे,नंदुरबार शहराध्यक्ष गणेश सोनवणे,पावबा वळवी आदी उपस्थित होते.